३ लाख कम्प्युटरची इंटरनेट सेवा खंडीत

जगभरातील सुमारे ३ लाख कम्प्युटरचे डीएनएस चेंजर या व्हायरसमुळे इंटरनेट बंद पडले असून भारतातील सुमारे १८ ते २० हजार कम्प्युटरला यामुळे बाधा निर्माण झाली आहे.

Updated: Jul 9, 2012, 04:11 PM IST

www.24taas.com, लंडन

 

जगभरातील सुमारे ३ लाख कम्प्युटरचे डीएनएस चेंजर या व्हायरसमुळे इंटरनेट बंद पडले असून भारतातील सुमारे १८ ते २० हजार कम्प्युटरला यामुळे बाधा निर्माण झाली आहे.

या व्हायरसमुळे तुमच्याकडील इंटरनेट ट्राफिक एक बनावट वेबसाईटकडे वळविण्यात येऊन तुमचे काम बिघडू शकते.
बनावट वेबसाईटसाठी काम करणारा 'डीएनएस चेंजर' हा व्हायरस एफबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शोधून काढला होता. त्याला नष्ट करण्‍यासाठी एफबीआयने दोन चांगले सर्व्हर बसवून इंटरनेट फ्लो त्यावरून वळवला. मात्र, ही यंत्रणा आज, 9 जुलै रोजी बंद होणार होती. त्यामुळे डीएनएसने प्रभावित झालेल्या कम्प्युटर्सची इंटरनेट सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

कसा चेक करणार तुमचा कम्प्युटर


'डीएनएस चेंजर' हा भयंकर व्हायरस तुमच्या कम्प्युटरमध्ये आहे किंवा नाही, हे तुम्ही काही सेकंदात माहीत करू शकतात.

1. वेबसाईट www.dns-ok.us वर जा.

2. डीएनएसच्या मुख्यपानावर जाऊन I Agree वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एक पान ओपन होईल. जर त्यात तुम्हाला हिरव्या रंगाचे बॅनर दिसेल. तर देव पावला. तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही.

3. हिरव्या रंगाचे बॅनर संकेत देते की तुमच्या कम्प्युटरमध्ये हा व्हायरस नाही.

4. जर तुमच्या स्क्रिनवर लाल रंगाचे बॅनर दिसत असेल तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा व्हायरस आहे. परंतु घाबरून जाऊ नका. त्याला तुम्ही सहज स्कॅन करून त्याला डिलेट करू शकता.

तसेच 'डीएनएस चेंजर'ला डिलेट करण्‍यासाठी इंटरनेटवर अनेक उपाय आहेत. फ्री व्हायरस स्कॅन आणि रिमूव्हल सॉफ्टवेयर्ससाठी www.dcwg.org/fix वर जाऊन फ्री व्हायरस स्कॅन करू शकता. परंतु कॉम्प्युट स्कॅन करण्‍यापूर्वी तुमचा महत्त्वाचा डेटाचा बॅकअप घ्या.