चायना मोबाइल की मोबाइल बॉम्ब!

सध्या बाजारात हजार ते बाराशे रुपयांत मिळणा-या मोबाईलची चलती आहे. यापैकी बहुतांशी मोबाईल चायना बनावटीचे आहेत. मात्र स्वस्तातल्या या मोबाईलचा वापर जीवघेणा ठरु शकतो.

Updated: Jul 8, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com, अखिलेश हळवे

 

सध्या बाजारात हजार ते बाराशे रुपयांत मिळणा-या मोबाईलची चलती आहे. यापैकी बहुतांशी मोबाईल चायना बनावटीचे आहेत. मात्र स्वस्तातल्या या मोबाईलचा वापर जीवघेणा ठरु शकतो.

 

नागपुरमधल्या १२ वर्षांच्या चिमुकल्या मयूरचा उजवा डोळा चायनिज मोबाइलमुळे पूर्ण निकामा निकामी झालाय. चेह-याच्या उजव्या बाजूला अनेक जखमा झाल्या आहात. धातूचे लहान लहान तुकडे खोलवर रुतून बसले आहेत. इतकंच नाहीतर उजवा अंगठाही त्यानं गमावलाय. त्याचा दोष इतकाच की त्याला मोबाईल गेम खेळण्याची आवड होती... पॉकेटमनीच्या १२०० रुपयांतून खरेदी केलेल्या स्वस्त अशा चायना मोबाईलवर गेम खेळणे आणि गाणी ऐकण्याचा त्याला छंद होता. मात्र हीच हौस मयूरला महागात पडली आहे. हाच चायना मोबाईल एखाद्या बॉम्बप्रमाणे मयूरच्या हातातच फुटला.

 

मयूरच्या डोळ्याला भविष्यात आणखी धोका निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे अशा जीवघेण्या चायना मोबाईलवर बंदी घालण्याची मागणी मयूरच्या वडिलांनी केली आहे. चायना मोबाईलचा अशाप्रकारे हातात बॉम्बप्रमाणे स्फोट होण्याची नागपुरातली ही काही पहिली घटना नाही.

 

मात्र या मोबाईलच्या विक्रीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळं आता स्वस्त मोबाईलच्या मोहात न पडता ग्राहकांनीही डोळ्यात तेल घालून योग्य मोबाईल खरेदी करणं तितकंच गरजेचं झालंय.