www.24taas.com, कॅलिफोर्निया
आठ देशांच्या ७१ संस्थांच्या ८० हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की माणसाची स्मरणशक्ती ४ प्रकारच्या जीन्सवर अवलंबून असते.
अल्झायमरच्या अनुवंशिक घटकांची माहिती मिळाल्यामुळे आता मेंदूच्या विकासावर काम करता येणं शक्य आहे. असं कॅलिफोर्निया विश्वविद्यालयच्या नेतृत्वाखाली एका आंतरराष्ट्रीय पथकाने सांगितलं आहे. यातील पहिला अभ्यास ९ हजारहून जास्त लोकांच्या अनुवंशिक विश्लेषणावर आधारीत होते. याच संशोधनातून चार प्रकारच्या जीन्सचं महत्व समोर आलं. हेच जीन्स मेंदूच्या स्मरणशक्ती निर्माण करणाऱ्या मेदूंतील भागाला संकुचित करतात.
याच अभ्यासातून आणखी एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे वाढत्या वयानुसार हिप्पोकँपस नावाच्या मेंदूच्या भागाला संकुचित करतात. जर ही प्रक्रिया वेगाने घडली, तर यामुळे अल्झायमरचा विकार उद्भवतो.