www.24taas.com, वॉशिंग्टन
ही बातमी वाचून तुमच्या डोक्याच्या सगळ्या चिंता दूर होतील, कारण चिंता करणं हे बुद्धिमत्तें लक्षण असल्याचं नव्या अभ्यासातून समोर आलंय. एसयूएनवाय डॉनस्टेट मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की साधारणतः काळजी करणं करणं हे नकारात्मक मानलं जातं. तर विद्वत्तेला सकारात्मक. मात्र हे दोन्ही गुण एकमेकांशी संबंधित आहेत.
काळजी करणारे लोक हे अत्यंत बुद्धिमान असून ते णकाच गोष्टीचा जास्तीत जास्त शक्यता विचारात घेत असतात. त्यात ते कुठलाही धोका पत्करत नाहीत. यामुळेच त्यांना चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे काळजी करणारा माणूस हा बुद्धिमान असून काळजी करत राहाणं हे त्याचं वैशिष्ट्य मानलं जायला हवं.
आपल्या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एंझायटी म्हणजेच काळजी करण्याचा आजार असणाऱ्या लोकांबरोबरच त्यांच्यापेक्षा एधिक सशक्त लोकांना सामील करून घेतलं. त्यांचा बुद्ध्यांक तपासल्यानंतर काळजी करणाऱ्यांचा बौद्धिक स्तर जास्त असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.