वेबसाईटवर नियंत्रण अशक्य- गुगल

गुगल इंडिया आणि फोसबुक इंडियाने सोमवारी दिल्ली हायकोर्टाला पुन्हा एकदा सांगितलं की अब्जावधी लोक वेबसाईट वापरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने अपलोडिंग सुरू असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं, ती नियंत्रणात ठेवणं अशक्य आहे.

Updated: Jan 17, 2012, 01:09 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

गुगल इंडिया आणि फोसबुक इंडियाने सोमवारी दिल्ली हायकोर्टाला पुन्हा एकदा सांगितलं की अब्जावधी लोक वेबसाईट वापरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने अपलोडिंग सुरू असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं, ती नियंत्रणात ठेवणं अशक्य आहे.

दिल्लीच्या उच्च न्यायालयाने २१ वेबसाईट्सवर तथाकथित अश्लील आणि आक्षेपार्ह चित्र, मजकूर असल्याचं कारण देत फेसबुक, गुगलवर बंदी घालण्यासंबंधी विचार सुरू केला आहे. यासंबंधातली सुनावणी १९ जानेवारीपर्यंत राखून ठेवण्यात आली आहे.

यापूर्वीही भारतात सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घालण्यासंबंधी धोरणं आखली जात होती. चीनमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सवर पूर्णतः बंदी आहे. मात्र, अशा प्रकारची बंदी घालणं म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर सरळसरळ हल्ला असल्याचं मत देशभरातून व्यक्त होत आहे.