'मंगळ'स्वारी यशस्वी, जीवसृष्टीचा शोध सुरू

नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.

Updated: Aug 6, 2012, 11:33 AM IST

www.24taas.com, न्ययॉर्क

 

नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. तब्बल ३५ कोटी मैलांचा खडतर प्रवास करून ही गाडी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. नासाचे १५०० वैज्ञानिक या मोहिमेचा वेध घेत होते.

 

मंगळावरील संभाव्य जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशानं नासाची क्युरिऑसिटी ही रोव्हर गाडी आज सकाळी ११ वाजता तिथल्या पृष्ठभागावर उतरणार आहे. अतिशय साहसी असा हा प्रयोग असून त्याचं थेट प्रक्षेपण नासा टीव्हीवर केलं. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर इथं एका मोठ्या पडद्यावर हे चित्रण दाखवलं जात होतं. नोव्हेंबरमध्ये पाठवलेली ही गाडी आठ महिन्यांच्या प्रवासानंतर मंगळावर पोहचली. आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक अशी ही मोहिम मानली जात होती. क्युरिऑसिटी रोव्हर गाडी ही एक विज्ञान प्रयोगशाळाच असून गेल विवराजवळ ती उतरली आहे. आज हा ऐतिहासिक क्षण साऱ्यांना अनुभवायला मिळाला आहे.

 

जिथे ही रोव्हर गाडी उतरणार आहे तिथली स्थिती अनुकूल असल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. ३५ कोटी मैलांचा खडतर प्रवास करून ही गाडी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुईच्या नाकातून दोरा ओवताना जशी अचूकता लागते तसाच काहीसा हा प्रकार आहे असं नासाच्या मंगळ मोहिमेचे व्यवस्थापक अँमडोर यांनी सांगितलं आहे. आवाजाच्या सतरा पट वेगानं म्हणजे ताशी १३००० मैल वेगानं क्युरिऑसिटी ही गाडी मंगळाच्या वातावरणात प्रवेश करेल. १५ कोटी ४० लाख मैल अंतरावरून नासाचे १५०० वैज्ञानिक रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभूमीवर धावताना पाहण्यास सज्ज होते.