पासवर्डला लवकरच बाय'पास'!

कम्प्युटर तज्ञ आता केवळ नाव टाईप केल्यानंतर कम्प्युटरवर कामाला सुरुवात करता यावी आणि पासवर्डची आवश्यकता भासू नये यासाठी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑस्ट्रेलियातील डिफेन्स ऍडवान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी किंवा इंग्रजीत संक्षिप्त नाव असलेली DARPA संस्था हा प्रयत्न करत आहे.

Updated: Mar 19, 2012, 08:18 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

आता केवळ नाव टाईप केल्यानंतर कम्प्युटरवर कामाला सुरुवात करता यावी आणि पासवर्डची आवश्यकता भासू नये यासाठी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात कम्प्युटर तज्ञ आहेत. ऑस्ट्रेलियातील डिफेन्स ऍडवान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी किंवा इंग्रजीत संक्षिप्त नाव असलेली DARPA संस्था हा प्रयत्न करत आहे.

 

तुम्ही ज्या पद्धतीने टाईप करता त्यावरुन तुम्ही तीच व्यक्ती आहात हे निश्चित करण्यासाठी सॉप्टवेअर विकसीत करण्यासाठी संशोधनाकरता निधी ही एजन्सी वितरीत करणार आहे.

 

 

सैन्यासाठी उपयुक्त असं क्रांतीकारक संशोधन करणं, हा DARPAचा प्रमुख उद्देश आहे. या संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजरच्या मते, आता तुम्ही कम्प्युटरवर बसल्यानंतर तुम्ही स्वत:ची ओळख दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला काम सुरु करता यायला पाहिजे आणि त्याची खातरजमा पडद्यामागे व्हायला पाहिजे. तुम्ही तुमचे काम कोणत्याही व्यत्यायशिवाय करु शकला पाहिजेत. बायोमेट्रिक सेन्सर्स किंवा थंब प्रिंट किंवा आयरिस स्कॅनर्सचा उपयोग न करता हे साध्य करता यायला पाहिजे असा या संशोधनाचा उद्देश  आहे.

 

 

 

माणसाच्या वागणुकीच्या आधारावर तंत्रज्ञानाला अवलंबून राहता यावं असा प्रयत्न आहे त्याला कॉगनिटिव फिंगरप्रिंट असंही म्हणतात. कम्प्युटर वापरणाऱ्याची ओळख त्याच्या कम्प्युटर वापरण्याच्या सवयीवर ओळख पटवता आली पाहिजे आणि मग पासवर्डची पद्धत कालबाह्य होईल. प्रत्येक माणूस कितीवेळ एखादे बटन दाबून ठेवतो, तसंच एका बटनावरुन दुसरीवर जाण्यासाठी किती वेळ घेतो यावरुन त्याची ओळख पटवता येणं शक्य होऊ शकते आणि त्यादृष्टीने तंत्रज्ञान विकसीत करता येईल का?, यासाठी संशोधन करण्यावर भर दिला जात आहे.