कँसरवरील इलाज सापडला

अनेक वर्षांपासून डॉक्टर्स कॅन्सरवरील इलाज शोधत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळू लागलं आहे. शासंत्रज्ञांनी पहिल्यांदाच या गोष्टीचा खुलासा केला आहे.

Updated: Mar 15, 2012, 12:37 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

अनेक वर्षांपासून डॉक्टर्स कॅन्सरवरील इलाज शोधत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळू लागलं आहे. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच या गोष्टीचा खुलासा केला आहे. दोन प्रोटिन्स कशाप्रकारे एकत्र येऊन कॅन्सरग्रस्त पेशींमधये सामाऊन जातात आणि सक्रिय राहून कॅन्सर अडवतात याचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे.

 

हा शोध भविष्यात कॅन्सरवर इलाजासाठी एक ऐतिहासिक शोध मानला जात आहे. याच शोधाच्या आधारावर अभ्यास करून प्रभावशाली इलाज शोधून काढण्यात येऊ शकतो.

 

प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायंसेसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एका आंतरराष्ट्रीय ग्रुपच्या म्हणण्यानुसार त्यांनी एनओएनओ आणि पीएसपीसी वन नावाच्या दोन प्रोटीन्सच्या समन्वयातून बनणाऱ्या अण्विक साच्याची ओळख पटली आहे. हे प्रेटिन्स कँसरमध्ये जीन्स जीवंतही ठेवू शकतात आणि मारूही शकतात. ‘एनओएनओ’ आणि पीएसपीसी वन नावाची ही दोन प्रोटीन्स मानवी शरीराच्या ‘पारास्पेकल’ पेशींमध्येच आढळली आहेत.