www.24taas.com, कॅलिफोर्निया
माणसाच्या चांगुलपणासाठी आपण बहुतेकवेळा स्वभाव किंवा त्याच्या संस्कारांना जबाबदार धरलं जातं. पण, शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की माणसाच्या वागण्यातील चांगुलपणा जीन्सवर अवलंबून असतो.
कॅलिफोर्नया विश्वविद्यालय आणि इर्विनच्या बुफालो विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी लोकांच्या चांगुलपणाला जबाबदार असणाऱ्या ऑक्सीटॉक्सीन आणि वॅसोप्रेसिन यांचा रिसेप्टर जीनशी संबध आढळून आला आहे. या जीनचा संबंध लोकांच्या चांगुलपणाशी असतो.
सायकोलॉजिकल सायंस या विज्ञान पत्रिकेत यासंबंधी लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये असं लिहीण्यात आल आहे की मनुष्याचा चांगुलपणा जीन्सवर अवलंबून असतो. आपल्या शरीरत असणारे ऑक्सीटॉक्सीन आणि वॅसोप्रेसिन हार्मोन्स रिसेप्टर जीनहून जास्त प्रभावी असतील, तर आपला स्वभाव जास्तच चांगला आणि सौम्य बनतो.