मतदानाला संमिश्र प्रतिसाद, उद्या निकाल..

आज राज्यातील ५ महापालिकासाठी निवडणूका घेण्यात आल्या, मतदानाला आज संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. परभणी महापालिकेच्या मतदानात नागरिकांचा मोठा उत्साह आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झालं आहे.

Updated: Apr 15, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज राज्यातील ५ महापालिकासाठी निवडणूका घेण्यात आल्या, मतदानाला आज संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. परभणी महापालिकेच्या मतदानात नागरिकांचा मोठा उत्साह आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झालं आहे. तर मालेगावमध्ये ५५ टक्के मतदान झालं आहे. चंद्रपूरात ५४ टक्के  तर लातूरमध्ये ५० टक्के मतदान झालं आहे.

 

तर भिवंडीत दुपारी साडेतीनपर्यंत ४६ टक्क्यांच्या आसपास मतदान झालं आहे. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झालं. सर्व पाचही ठिकाणी उद्या मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील आणि त्याचे सत्तेचं चित्र स्पष्ट होईल.

 

भिवंडी, मालेगाव, लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेसाठी मतदान आज झालं परभणी आणि मालेगावमध्ये मतदानात विशेष उत्साह आहे. दुपारी दीडपर्यंत परभणीत ४८ टक्के मतदान झालं होतं. तर मालेगावमध्ये जवळपास ४५ टक्के मतदान झालं होतं. लातूर ४० तर चंद्रपूरमध्ये ३९ टक्के मतदान दुपारपर्यंत झालं होतं. या तुलनेत भिवंडीत दुपारपर्यंत कमी उत्साह होता. भिवंडीत दुपारी दीड पर्यंत ३६ टक्के मतदान झालं आहे.

 

 

 

 

Tags: