'पाणी देणार नाही, शासनाचा निर्णय अमान्य'

उस्मानाबाद जिल्हयातील सीना कोळेगाव धरणातील पाणी नदीमार्गे सोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. या निर्णयावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत धरणाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.

Updated: May 10, 2012, 02:23 PM IST

www.24taas.com, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्हयातील सीना कोळेगाव धरणातील पाणी नदीमार्गे  सोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. या निर्णयावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत धरणाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले. संतप्त शेतक-यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सीना-कोळेगावच्या अभियंत्यांना घेराव घातला.

 

सीना कोळेगाव धरणातील पाणी सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यासाठी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  पण, विशेष म्हणजे १०० किलोमीटर अंतर कापून सोलापूरसाठी नदीमार्गे पाणी पोहोचने  शक्य नाही, असं मत सीना कोळेगाव प्रकल्पाच्या अभियंत्यांनीच  व्यक्त केले आहे. तसंच सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाणीसाठ्याबाबत चुकीची माहिती देऊन वरिष्ठांची आणि शासनाची दिशाभूलही केली आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांच्या नागरिकांमध्ये आपांपसांतच  पाण्यासाठी संघर्ष निर्माण झाला आहे. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सोलापूरच्या अधिकाऱ्यांविरोधात  फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.