सहा महिन्यात साडे चारशे लोक बेपत्ता

राष्ट्रवादी काँग्रेसचं शासन असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये सहा महिन्यांत तब्बल साडे चारशे जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे.

Updated: Jul 25, 2012, 06:23 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

राष्ट्रवादी काँग्रेसचं शासन असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये सहा महिन्यांत तब्बल साडे चारशे जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या बेपत्ता होण्यामुळे पिपंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीचा प्रश्न मोठा असल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय पोलीस यंत्रणा काय करत आहे असा प्रश्न उभा राहिला आहे.

 

पिंपरी चिंचवडमध्ये लोक बेपत्ता होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. पिंपरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तब्बल १२८ जण, चिंचवडमध्ये ८३, सांगवीमध्ये १४०, निगडीत ८४ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता होणा-यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.

 

या व्यक्तींना शोधण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थितीत पोलिसांनी जास्तीत जास्त प्रयत्न करुन बेपत्ता झालेल्यांना लवकरात लवकर शोधावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.