विद्यार्थ्यांचा मृत्यू : बांधकाम, पालिकेला नोटीस

सांगलीतल्या स्कूलबसवर झाड कोसळून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला नोटीस बजावलीय. झाडाच्या खबरदारीबाबत या नोटीशीतून खुलासा मागवण्यात आलाय.वनखात्याच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

Updated: Mar 17, 2012, 09:13 PM IST

www.24taas.com, सांगली

सांगलीतल्या स्कूलबसवर झाड कोसळून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला नोटीस बजावलीय. झाडाच्या खबरदारीबाबत या नोटीशीतून खुलासा मागवण्यात आलाय.वनखात्याच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

सांगली-मिरज रोडवर असलेल्या या कोसळलेल्या झाडाचा बुंधा जाळल्याचंही बोललं जातंय.. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर याप्रकरणी PWD आणि महापालिकेची चौकशी करून दोषींवर करावाई करण्याचं आश्वासन वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे.

या प्रकरणात वनमंत्र्यांनी महापालिकेकडे बोट दाखवलं असलं तरी महापौरांनी अपघातग्रस्त रस्ता आणि झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचं काम केलंय. तर पोलिसांनी मात्र महापालिका आणि बांधकाम विभागाची चौकशी सुरु असल्याचं सांगितले आहे. दोषींवर खरोखर कारवाई होणार का ? की फक्त चौकशीचा फार्स होणार ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.