वारीमध्ये अपघात, दोन वारकरी ठार

पुणे-सोलापूर रस्त्यावर सहजपूर इथं कंटेनरच्या धडकेत दोन वारक-यांचा मृत्यू झाला आहे. तसंच 3 ते 4 वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Updated: Jun 17, 2012, 04:02 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे-सोलापूर रस्त्यावर सहजपूर इथं कंटेनरच्या धडकेत दोन वारक-यांचा मृत्यू झाला आहे. तसंच 3 ते 4 वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. तुकाराम महाराजांच्या पालखीतील हे वारकरी होते. यवतहून ही पालखी वरवंडला निघाली होती. कित्येक दिवसांच्या या पायी प्रवासात वारक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाऊस, ऊन, वारा याची जराही तमा न बाळगता विठूरायाच्या भेटीच्या ओढीनं वारकरी मार्गक्रमण करत असतात. त्यात अशा अपघातांनीही मनोधैर्य खचत नाही.

 

या वारक-यांच्या सेवेसाठी विविध संस्था आणि स्वयंसेवी संस्था पुढं येतात. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टर चोवीस तास या आजारी वारक-यांवर उपचार करत असतात.