योजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

Updated: Jun 2, 2012, 07:14 PM IST

www.24taas.com, पुणे

 

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात वनमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी सरकारची चांगली कामं जनतेपर्यंत पोहचत नसल्याबद्दल माध्यमांना जबाबदार धरलं.

 

राज्यात राजीव गांधी जीवनदायनी योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विध्यार्थ्यासाठी शाळांमध्ये आरक्षण यांसह दुष्काळ निवारणाच्या अनेक योजना सरकारतर्फे राबविल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरु आहे. मात्र सरकारच्या कामांना योग्य ती प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकरची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्याच काम सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी करावं, अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

सरकारद्वारे सुरु असलेली चांगली काम जनतेपर्यंत पोहचत नसल्याची खंत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पतंगराव कदम यांनीही व्यक्त केली. राज्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी मोठ्या प्रमाणात उपाय़योजना असताना माध्यमे मात्र चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करून छोट्या त्रुटींना जास्त प्रसिद्धी देतात, असं मत व्यक्त केलं.