दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात गर्भपाताच्या प्रकरणानंतर सरकारला जाग आलीय. प्रकरणातले खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलय. नवदांपत्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव करु नये यासाठी गावोगावी सरपंचांमार्फत प्रबोधन केलं जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात भोगावतीमध्ये महिलेचा गर्भपात आणि बीडमध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकऱणाची गंभीर दखल घेण्यात आलीय. संशयितांवर लवकरात लवकर कारवाई करून खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
मुलगी असल्यावर होणारे गर्भपात टाळण्यासाठी लोकांच प्रबोधन गरजेचं आहे. त्याच बरोर नवविवाहितांना मुलाग-मुलीत भेद करू नकार हे समजून सांगण्यासाठी सरपंचांमार्फत प्रबोधन केलं जाणार आहे.स्त्री भ्रूणहत्ये प्रकऱणी संशयितावर जरब बसेल अशी कारवाई झाली तर याला आळा बसेल त्यात बरोबर प्रबोधन महत्त्वाचं आहे.