तळेगावात राष्ट्रवादीची मुसंडी, भाजपला धक्का

Updated: Dec 12, 2011, 10:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

मावळ गोळीबारनंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तळेगाव नगरापलिका निवडणुकीत तळेगावकरांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या हातातील सत्ता आघाडीकडे सोपवली. गोळीबारानंतर भाजपने हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारून भाजपला धक्का बसला आहे.

तळेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १५ जागा जिंकून सत्ता मिळवली. भाजपला मात्र फक्त ८ जागा जिंकता आल्या.

दुसरीकडे जुन्नर नगरपालिकेत १७ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या असून, मनसेने २ जागा जिंकून खाते उघडले आहे.

 इंदापूर नगरपालिकेत काँग्रेसला निसटता विजय मिळाला असून, हर्षवर्धन पाटील यांना विचार करायला लावणारा हा निकाल आहे. काँग्रेसला ९, तर राष्ट्रवादी ८ जागा मिळाल्या आहेत.

आळंदी नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अपक्षांनी ६ जागांवर विजय मिळवला असतून काँग्रसप्रणीत शहरविकास आघाडी - ५ , राष्ट्रवादी – १ जागेवर विजय मिळवला आहे.

 सासवड नगरपालिकेत जनमत विकास आघाडी - १३ जागा जिंकून विजयी झाली आहे. तर सेनेला १ आणि 
राष्ट्रवादी ३ जागेवर विजय मिळवता आला आहे.

जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी आघाडी - १२ जागा जिंकून विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ५ जागेवर समाधान मानावे लागले आहे.