साईबाबा संस्थान विश्वस्तांविरूध्द गुन्हा

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated: Mar 3, 2012, 02:52 PM IST

www.24taas.com, अहमदनगर

 

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

संस्थानचा कारभार पारदर्शी करण्यासाठी राज्य सरकारनं कायद्यात बदल करत राजकीय व्यक्तींची विश्वस्त म्हणून नेमणूक केली होती. मात्र या विश्वस्तांनी साई संस्थानच्या तसंच काही खासगी वाहनांचाही स्वत:च्या खासगी कामासाठी वापर केला. इतकंच नव्हे तर खोट्या क्रमांकाचे तपशील देऊन मोठ्या प्रमाणात बिलं वसूल केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.

 

 

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी करताना राहाता न्यायालयानं शिर्डी पोलिसांना गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे विश्वस्त के सी पांडे उर्मिला जाधव व त्यांच पती प्रदीप जाधव आमि विश्वस्त कॅप्टन वासुदेव आणि संस्थान वाहन विभाग प्रमुख भाऊसाहेब शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.