शिर्डी: व्हीआयपी दर्शनाला 'नो एन्ट्री'

नववर्षाची सुरवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी लाखो भाविकांची इच्छा असते त्यामुळेच नववर्षाच्या सुरवातीला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी तासंतास लाबंच लांब रांगा लावून दर्शन घेतात, त्यामुळे नववर्षानिमित्ता बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपींना प्रवेश बंद राहणार आहे.

Updated: Dec 25, 2011, 09:59 AM IST

झी २४ तास वेब टीम, शिर्डी

नववर्षाची सुरवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी लाखो भाविकांची इच्छा असते त्यामुळेच नववर्षाच्या सुरवातीला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी तासंतास लाबंच लांब रांगा लावून दर्शन घेतात, त्यामुळे नववर्षानिमित्ता बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपींना प्रवेश बंद राहणार आहे.

साईबाबांच्या शिर्डीत आता व्हीआयपींची रांग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच आता व्हीआयपींनाही रांगेत उभं रहावं लागणार आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्यानिमित्तानं संस्थानतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वर्षाची सुरुवात साईबाबांचं दर्शन घेऊन करण्यासाठी अनेक भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळं या सर्वसामान्य लोकांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

सरकारी अधिकारी असो की नेते मंडळी. कुणालाही पूजेसाठी खास व्हीआयपी एन्ट्री मिळणार नाही. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साईंचं मंदिर रात्रभर खुलं असणार आहे. २० हजार भाविकांना बसता येईल, असा मांडवही टाकण्यात आला आहे.

पाहा खास व्हिडिओ

[jwplayer mediaid="18073"]