फकिराचे देवस्थान झाले अमीर

आयुष्यभर फकिर राहलेल्या सबका मालिक एक साईबाबांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहचली आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदनगर

 

आयुष्यभर फकिर राहलेल्या सबका मालिक एक साईबाबांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहचली आहे. शंभरहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या साईबाबांच्या समाधी मंदिरातील लक्ष्मीपूजनाच्या वेळेस डोळे दिपावून टाकणाऱ्या संपत्तीने साईभक्त भारावले. तब्बल २७५ किलो सोने आणि २९०० किलो चांदीचे लक्ष्मीपूजन संपन्न झाले. फुलांची आरास, रोषणाईचा झगमगाट आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिराला एका वेगळीत झळाळी प्राप्त झाली.

 

साईबाबांना एका वाण्याच्या दुकानदाराने पणतीसाठी तेल नाकारल्यानंतर त्यांनी पाण्याने दिप प्रज्वलित केल्याची आख्यिका सांगितली जाते. साईबाबा देवस्थान ट्रस्ट काळाच्या ओघात ऐषवर्यसंपन्न झाला आहे आणि आता अत्तराचे दिवेही लावण्याचे आर्थिक पाठबळही लाभलं आहे ही त्या अमिर फकिराच्या आशिवार्दाचीच कृपा नाही का?