गुलाबराव देवकरांना पुन्हा एकदा नोटीस

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यमंत्री गुलाबराव देवकरांना नोटीस बजावली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर सध्या जामिनावर आहेत. मात्र या जामिनासंदर्भातली सर्व कागदपत्र 18 जुलैला कोर्टात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

Updated: Jul 5, 2012, 07:14 PM IST

www.24taas.com, जळगाव

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यमंत्री गुलाबराव देवकरांना नोटीस बजावली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर सध्या जामिनावर आहेत. मात्र या जामिनासंदर्भातली सर्व कागदपत्र 18 जुलैला कोर्टात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

देवकर आणि सरकारी पक्षाला हे आदेश देण्यात आलेत. जळगावमधल्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकर यांना अटक करण्यात आली होती. देवकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांना जामीन देऊ नये असा अर्ज जळगाव न्यायालयात दाखल करण्यात आला होता. पण त्यावेळी देवकर यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजुर झाला होता.

त्यानंतर प्रेमानंद जाधव, नितीन चौधरी आणि छगन पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात 11 जुनला दुसरी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं देवकर आणि सरकारी पक्षाला जामिनासंदर्भातली कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत