शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

Updated: Dec 2, 2011, 02:37 PM IST

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ

 

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा लावल्याने ऐन रब्बी हंगामात शेतकरी कचाट्यात   लाय. विविध संकटांचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना आता महावितरणने जोरदार झटका दिलाय. खरीप हंगामात आलेला कापूस अजूनही
शेतकऱ्यांच्या घरात पडून असतांना महावितरणाने थकीत वीज बील वसुलीसाठी कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा लावला.

 

यवतमाळ जिल्ह्यात महावितरणने २०००हून अधिक कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकरी  मोठ्या संकाटात सापडलाय. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ऊस आणि भाजीपाल्याच्या लागवड यामुळे कोलमडल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची पीकं करपू लागली आहेत.शेतकऱ्यांचा कापूस हभीभाववाढीच्या अपेक्षेने अजूनही घरातच आहे. सोयाबीनचेही दर गडगडले आहे. अशातच रब्बीतील पेरणीचा खर्च झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. तर वीज वितरण कंपनीने थकीत वीज बील वसूलीची मोहीम सुरु केली आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे त्यामुळे  हाती पैसेच नसल्याने वीज बील भरायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. शेतकऱ्यांना वर्षभर अनियमीत वीज पुरवठा करणाऱ्या वीज कंपन्या शेतकऱ्यांकडून नियमीत वीज बील भरण्याची अपेक्षा ठेवतात. वीज कंपन्यांमुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीच घट येते असं असतानाही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे सगळेच डोळेझाक करतात. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधून शेतकऱ्यांनी सरकारलाच शॉक देणं गरजेचं बनलंय.