शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'
कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.
Dec 2, 2011, 02:37 PM ISTराणेंचा उद्धव ठाकरेंचा टोला
निवडणुका आल्यानंतरच उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण येते असा सणसणीत टोला नारायण राणेंनी लगावलाय. कापूस प्रश्नावर शिवसेना शेतकऱ्याची दिशाभूल करतेय, उद्धव ठाकरे य़ांनी आधी शेतीचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे अशी टीका नारायण राणेंनी औरंगाबादेत केलीय.
Dec 1, 2011, 05:15 PM ISTभाजपाचे आ.गिरीश महाजन यांनी उपोषण सोडलं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलं आहे. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
Nov 26, 2011, 11:31 AM ISTशेतकरी विधवाही कापूस आंदोलनात
यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला.
Nov 25, 2011, 10:11 AM ISTकापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन
कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.
Nov 23, 2011, 10:59 AM ISTकापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.
Nov 23, 2011, 10:46 AM ISTकापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.
Nov 21, 2011, 07:30 AM ISTकापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट
कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.
Nov 16, 2011, 02:50 AM IST