टोलमध्ये झोल... कोट्यावधीची होणार पोलखोल

कालच मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल नाक्यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी करण्यात आली, पण हिवाळी अधिवेशानात आज ह्याच विषयावर विरोधकांनी एक गोप्यस्फोट करून सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे.

Updated: Dec 19, 2011, 07:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर 

 

कालच मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल नाक्यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी करण्यात आली, पण हिवाळी अधिवेशानात आज ह्याच विषयावर विरोधकांनी एक गोप्यस्फोट करून सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे. मुंबई आणि ठाणे टोलनाक्यावरील वसुलीत दहा हजार कोटीं घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहे.

 

मुंबई आणि ठाण्यातील टोल नाक्यांवरील एन्टीपॉईंट टोलवसुलीत दहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रश्नावर विरोधकांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या गोंधळामुळं विधानसभेचं कामकाज बारा वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं होतं.

 

मुंबई ठाण्यातील टोलवसुलीत घोटाळा करण्यात आल्यामुळे  विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला.  विरोधकांनी विधानसभेत एंट्रीपॉईंट टोलवसुलीत घोटाळ्याचा आरोप केले आहेत. तर या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत घोटाळ्यावर श्र्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.