आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनाचा वापर

नागपूरमध्ये आंबे पिकवण्यासाठी कॅलशीयम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर केल्याचं उघड झालंय. एफडीएनं टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झालाय. त्या ठिकाणचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.

Updated: May 19, 2012, 09:44 AM IST

www.24taas.com, नागपूर

 

नागपूरमध्ये आंबे पिकवण्यासाठी कॅलशीयम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर केल्याचं उघड झालंय. एफडीएनं टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झालाय. त्या ठिकाणचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.

 

पिवळ्या धमक दिसणा-या या आंब्यांकडं पाहिल्यानंतर तो खाण्चाचा मोह कुणालाही आवरणार नाही....मात्र थांबा... हा आंबा जेवढा चांगला दिसतोय तेवढाच तो तुमच्या शरीरासाठी घातक आहे...कारण  हा आंबा पिकवण्यासाठी कॅलशियम कार्बाईड या घातक केमिकलचा वापर करण्यात आलाय. (आंबा पेटी कॅलशियम कार्बाईड स्टील इमेजेसह वापरणे) नागुराच्या संत्रा मार्केटमध्ये आंबे पिकवण्याचा हा प्रकार बिन बोभाटपणे सुरू होता. अन्न व औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.

 

आंबा पिकवण्याचा हा कृत्रिम प्रकार ग्राहकांसाठी घातक असला तरी आंबा व्यापा-यांना मात्र त्यात वावग वाटत नाही.  उलट आम्ही आजपर्यंत अशाच प्रकारे आंबा पिकवल्याचं दिसून येत आहे. कॅलशीयम कार्बाइडच्या वापरामुळे पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळं कँन्सर सारखा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा प्रकारे आंबा पिकवून ग्राहकांच्या जीवाशी खेळणा-यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.