KDMCने अधिकाऱ्यांना पाठविले 'कायमचे घरी'

कल्याण -डोंबिवली महानगरपालिका मधील पाच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. केडीएमसीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. की, पाच अधिकाऱ्यांना सरळ घरचा रस्ता दाखवला आहे.

Updated: Apr 8, 2012, 12:16 PM IST

www.24taas.com, कल्याण

 

कल्याण -डोंबिवली महानगरपालिका मधील  पाच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. केडीएमसीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. की, पाच अधिकाऱ्यांना सरळ  घरचा रस्ता दाखवला आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीधर थल्ला यांच्यासोबत चार अधिकाऱ्यांवर अनधिकृत बांधकांमावर कारवाई करण्यास निष्काळजीपणा केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.

 

अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई केडीएमसीच्या महासभेमध्ये शनिवारी करण्यात आली. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पी. के. उगले, उपायुक्त अनिल लाड, सहाय्यक आयुक्त श्रीधर थल्ला आणि डेप्युटी इंजिनिअर राजेश मोरे व प्रमोद मोरे यांना आजपासूनच बडतर्फ करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.

 

त्यामुळे त्यंना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शनिवारच्या महासभेपुढे होता. थल्ला यांच्या खातेनिहाय चौकशीमध्ये देखील त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.