सेनेला दे धक्का, कपिल पाटीलांचा विजय झाला पक्का

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे. कपिल पाटील यांचा मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विजय झाला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनिषा कायंदेचा त्यांनी पराभव केला आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल आताच आपल्या हाती आला आहे. कपिल पाटील यांचा मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विजय झाला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनिषा कायंदेचा त्यांनी पराभव केला आहे.

लोकभारतीचे कपिल पाटील सलग दुसऱ्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आजच्या मतमोजणीत कपिल पाटील पहिल्यापासून आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांनी विजयी आघाडी कायम ठेवली.

मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक लोकभारतीच्या कपिल पाटील यांचा विजय झालेला आहे. शिवसेना पुरस्कृत मनिषा कायंदेंचा पराभव करीत कपिल पाटील यांनी सलग दुसरा विजय मिळविला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करीत मुंबई शिक्षक मतदारसंघात पाटील यांनी बाजी मारली आहे.