www.24taas.com, नवी मुंबई
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मात्र सर्वांच लक्ष लागलंय ते मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघाच्या निकालांकडे.
कोकणात राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेच्या पाठिंब्यासह रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर निलेश चव्हाण यांच्यात तिरंगी लढत रंगलीय. हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरें रिंगणात असल्यानं चुरस निर्माण झालीय.
यात डावखरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. मुंबई पदवीधरसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक सावंत रिंगणात आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. तर मुंबई शिक्षक मतदार संघात शिक्षकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील आणि शिवसेना पुरस्कृत भाजप बंडखोर मनीषा कायंदे यांच्यात लढत आहे....तर नाशिक शिक्षक मतदार मुख्य लढत शिवसेनेचे राजेंद्र लांडे जनराज्य पक्षाचे अपूर्व हिरे आणि टीडीएफचे निंबा नांद्रे यांच्यात आहे.