www.24taas.com, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल इन्सूली नदीत एक-दोन नव्हे तर तब्बल ५० मगरींच वास्तव्य आहे. मात्र या संपुर्ण नदीपात्रात अडिचशे मगरी असल्याचा स्थानिकांचा संशय आहे. या मगरी पर्यटकांसह स्थानिकांच्याही कुतूहलाचा विषय ठरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरखोल नदीचं पात्र इन्सूली गावातून वाहतं. हिरव्यागार निसर्गानं बहरलेल्या या भागात जसा विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट जाणवतो तसाच वन्य प्राण्यांचाही मुक्त संचार दिसतो. या नदीपात्रात एक दोन नाही तर बऱ्याच मगरी दुपारनंतर मुक्त संचार करताना दिसत आहेत.
इन्सुलीमधील मगरीचा मुक्त संचार अनुभवण्यासाठी सध्या पर्यटक इथं गर्दी करत आहेत. मात्र त्यामुळे मगरींच्या वास्तव्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. तर सिधंदुर्गवासियांना देखील मगरींच्या या वास्तव्याचा आनंद मात्र लुटता येणार आहे.