www.24taas.com, रायगड
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असो वा मेघडंबरीतील पुतळ्याचा विषय असो प्रत्येक वेळी किल्ले रायगड चर्चेत राहिला. गेल्या चाळीस वर्षांपासून असलेला किल्ले रायगडावरील शिवरायांचा पुतळा आता पुन्हा चर्चेत आलाय.
शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर छत्र बसविण्यासाठी शिवसेना आणि रायगड जिल्हा परिषद पुढे सरसावलीय. छत्र बसविण्यासाठी पुरातत्व विभागानं परवानगी नाकारली आहे. तरीही छत्र बसविण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा या मुद्यावरुन शिवसेना विरुद्ध पुरातत्व विभाग असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही संभाजी ब्रिगेड नामक संस्था वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकावा यासाठी प्रयत्न करत होती. महाराष्ट्र शासनाने हा पुतळा ६ जून २०११ पूर्वी हलवावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे लोक हा पुतळा हलवतील अशी धमकीवजा सूचनाही दिली गेली होती. याशिवाय शासनाने रायगडावर १ हजार कोटी खर्च करण्याची तरतूद करावी अशी मागणी केली होती.
[jwplayer mediaid="80272"]