वाळू माफियांचा रोहा तहसीलदारांवर हल्ला

वाळू माफियांच्या मुजोरी आणि थैमान सुरुच आहे. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्याचे तहसीलदार गणेश सांगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Updated: Apr 2, 2012, 01:00 PM IST

www.24taas.com, रोहा

 

वाळू माफियांची मुजोरी आणि थैमान सुरुच आहे. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्याचे तहसीलदार गणेश सांगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अवेध वाळूच्या विरोधात कारवाई करणाऱ्या गणेश सांगळेंवर नितीन परब यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. नितीन परब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. या प्रकरणी रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याची माहीती रोहा तहसीलदार गणेश सांगळेंना मिळाल्यानंतर ते आरे खूर्द येथे पाहणी करण्यासाठी रात्री दहा वाजता पोहचले. या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन परब आणि मनोज शिंदे हे दोघे तिथे आले. या दोघांनी तहसीलदार सांगळे यांची गाडी अडवून शिवीगाळ करत त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

शेकापच्या नेत्या मिनाक्षीताई पाटील यांनी राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन परब यांना तात्काळ पक्षातून निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे