बोलबच्चन गॅँग जेरबंद

Updated: Nov 16, 2011, 09:36 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेणा-या दहा जणांच्या
केलं आहे. या गँगन आणखी किती गुन्हे केले आहेत य़ाचा पोलीस शोध घेत आहेत.

 

मला ओळखलं का.. मी तुमचा मित्र आहे, अशी बतावणी करुन रस्त्यावरुन जाणा-या जेष्ठ नागरीकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने  आणि रोख रक्कम घेऊन पसार होणा-या बोलबच्चन गॅगला ठाणेनगर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. दहा जणांच्या या गॅंगचा मोठ्या हुशारीनं पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

 

या गॅंगकडून नऊ लाख पंचवीस हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तसच ही गॅग हातचालखी करुन चोरी कशी करायची याचा लाईव्ह डेमोही करुन दाखवला.

 

रमेश जैस्वाल, नरेहा जैस्वाल, अजय सावंत, अनिल शेट्टी, करीम खान, राजू चव्हाण, मोहम्मद भेमण, अरविंद कांबळे, सोनू सांगडे आणि अजय पवार अशी या आरोपींची नावं आहेत.

 

या दहा जणांवर आत्तापर्यंत अकरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी आणखी कुठे कुठे गुन्हे केले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.