बंदी झुगारून रायगडावर पंचधातूचं छत्र

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलोचं पंचधातुचं छत्र बसवलंय. मात्र, हे करताना बंदी झुगारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 4, 2012, 12:47 PM IST

www.24taas.com, अलिबाग

 

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी १३२  किलोचं पंचधातूचं छत्र बसवलंय. मात्र, हे करताना बंदी झुगारण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, हे छत्र काढण्याचा प्रयत्न कोणी केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असा ईशारा शिवप्रेमींनी 'झी २४ तास'शी बोलताना दिला आहे.

 

शिवाजी महाराजांचे वंशज उदनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली छत्र बसवण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा छत्राविना होता. छत्र बसवायला केंद्राच्या पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारली होती. त्याठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लावण्यात आलं होतं. ती झुगारुन शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र बसवलंय.

 

किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेकसोहळा तिथी नुसार मोठ्या उत्साहात पार पडतोय. देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी किल्ले रायगडावरगर्दी केली आहे.

 

शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने पारंपारिक वेशभुषा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं तसंच पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.