पाइपलाईन फुटली, ठाण्यात पाणीच पाणी

एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना ठाण्यात मात्र पालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. ठाण्याच्या कॅडबरी नाक्यावर शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास पालिकेची ६५० मिलीमीटर व्यासाची पाण्याची पाइपलाईन फुटली.

Updated: Apr 28, 2012, 08:50 AM IST

www.24taas.com, ठाणे

एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना ठाण्यात मात्र पालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. ठाण्याच्या कॅडबरी नाक्यावर शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास पालिकेची ६५० मिलीमीटर व्यासाची पाण्याची पाइपलाईन फुटली.

ही पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील सर्वच भागात शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे , अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. ठाण्यात ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं आणि नुतनीकरणाचं काम सुरु आहे. अशावेळी उघड्या पडलेल्या पाईपलाईनच्या चेंबरमध्ये बसचं टायर अडकल्याने पाईपलाईन फुटलीय आणि हजारो लीटर पाणी वाया गेले.

ठाणे महापालिकेची भूमिगत जलवाहिनी  अचानक फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अधिकार्‍यांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पाण्याची पाइपलाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने  वाहतुकीचीही कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर पाईपलाईन दुरुस्तीचं काम लवकरच करण्यात येईल, असं महापैरांनी सांगितले.