www.24taas.com, दिवा
दिव्यात मुंब्रादेवी रोड परिसरात राहणाऱ्या सहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करुन खून करणाऱाया संजय राठोडला अटक करण्यात आली आहे. मेघना वायगंणकर या विद्यार्थीनीच्या निर्घूण खून प्रकरणी रात्री उशीरा पोलीसांनी संजय राठोड अटक केली.
ठाण्यातल्या दिवा गावात एका दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीय. महत्वाचं म्हणजे लोडशेंडिग सुरु असल्यानं गावातली वीज गेली होती आणि या अंधाराचा फायदा घेऊन त्या नराधमानं आपला डाव साधला होता.
दरम्यान माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेमुळं ठाण्यातलं दिवा गाव शनिवारी सकाळी असं सुन्न झालं होतं. काही वेळातच तिचा मृतदेह घेऊन गाडी आली आणि सुन्न झालेलं गाव अक्षरश: आक्रोशात बुडालं. आईचा आक्रोश तर काळीज चिरर्र करणारा होता. जमलेल्या सगळ्यांच्याच मनात त्या नराधमाविषयी राग खणखणत होता. कारण आदल्या रात्रीच आपल्या क्लासवरुन घरी परतणा-या 10 वर्षीय पुजावर त्या नराधमानं बलात्कार करुन तिची हत्या केली होती. लोडशेडिंगमुळं दिवा गावातील वीज गायब झाली होती. या अंधाराचाच फायदा घेत त्या नराधमानं त्या चिमकुलीला खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करुन तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी टाकून तो फरार झाला.
मुंब्रा पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. मात्र अजूनही आरोपीचे काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
या धक्कादायक घटनेनंतर अनेक प्रश्नही समोर येतायत. लोडशेंडिंग रात्रीच्या वेळेत होत असल्यानं त्याचा फायदा असे गुन्हेगारी प्रवृतीचे घेऊ लागलेत. तसंच ज्या खोलीत घटना घडली, तिथं कोण राहत होतं. याची जराही कल्पना शेजा-यांना कशी नव्हती. आरोपीचा शोध पोलीस घेतीलही परंतु आपल्या चिमुकलीला गमावणा-या घरातल्यांच्या जखमा आयुष्यात कधीच भरणा-या नाहीत.
[jwplayer mediaid="59609"]