www.24taas.com, कपिल राऊत, ठाणे
महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालीय. शिवसैनिकांनी ठाण्यात 14 बसेस, 4 एसटी आणि 5 रिक्षांची तोडफोड केलीय. ठाणे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. शिवसैनिकांनी रात्रीपासूनच शहर बंद करायला सुरुवात केलीय. मुलुंड चौक, तीन हात नाका, हायवे, आनंदनगर नाका या परिसरातही शिवसैनिकांनी रात्रीपासून निदर्शनं केली.
ठाण्यातल्या भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण केल्याप्रकरणी आज ठाणे बंदचं आवाहन महायुतीच्या वतीनं करण्यात आलंय. नगरसेविका लोखंडेंच्यासोबत त्यांचे पती आणि मुलाचं अपहरण केल्याचा आरोप ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले यांनी केलाय. ठाण्यात भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत.. महापौरपदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका बेपत्ता झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
सुहासिनी लोखंडे या प्रभाग क्रमांक48 मधील नगरसेविका आहेत. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांना सध्या गुप्तस्थळी हलवण्यात आलयं. मात्र लोखंडे या गटाबरोबर गेल्या नव्हत्या. भाजप नगरसेवकांच्या गटासोबत लोखंडे का गेल्या नाहीत याचा जाब विचारण्यासाठी काल रात्री भाजप कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले होते. सुहासिनी लोखंडे या NCPच्य़ा संपर्कात असल्याचीही माहिती आहे. त्यांच्या घरासमोर पोलीसबंदोबस्तही ठेवण्यात आलाय. सध्या ठाण्यात महापौरपदासाठी आवश्यक असलेला 66चा जादूई आकडा गाठण्यासाठी महायुती आणि आघाडीत जोरदार चुरस आहे.. भाजप नगरसेविका अचानकपणे बेपत्ता होणं हा त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे.