टीएमटीचा त्रास, ठाणेकर झाले उदास

ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात असते.आता अकार्यक्षम कर्मचारी आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे ठाणेकर हैराण झाले.

Updated: Nov 18, 2011, 11:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात असते.आता अकार्यक्षम कर्मचारी आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे ठाणेकर हैराण झाले. आता तर  परिवहन सदस्यांनीही परिवहन प्रशासनावर अकार्यक्षम असल्याचा आरोप केला. ठाणे महापालिकेची परिवहन सेवा अक्षरश: डबघाईला आली. बंद पडणाऱ्या बसेस आणि राजकारण्यांचं संगनमत यामुळं उत्पन्न वाढत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

 

२५ लाख ठाणेकरांना सुविधा देण्यासाठी असलेली परिवहन सेवा सध्या अपूरी पडतेय. ठाणे परिवहन सेवेला रोज ४०० बसेसची गरज असताना प्रत्यक्षात मात्र निम्या बसेस धावतात. त्यामुळं ठाणेकर त्रस्त आहेत. त्यामुळं रोज २५ लाखांचं उत्पन्न अपेक्षित असताना केवळ 18 लाखांच उत्पन्न मिळतं. ठाणेकरांना वेळेवर सुविधा द्यावी आणि दुरुस्त केलेल्या बसेस रस्त्यावर आणाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.

 

परिवहन सेवा सक्षम करण्याकरिता पाउलं न उचल्यानं त्याचा परिणाम सेवेवर होतो आहे. आधीच वेळेवर न येणाऱ्या बसेस आणि नादुरुस्त बसेस रस्त्यावर उतरल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.११८ बसेसला पार्ट नसल्यानं रस्त्यावर धावू शकत नाहीत याकडं आयुक्तांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली. ठाणेकर नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली परिवहन सेवा दिवसेदिवस लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे.