www.24taas.com, सिंधूदूर्ग
बेडूक हा उभयचर प्राणी... जमिनीवर आणि पाण्यात आढळणाऱ्या या बेडकाची एक अनोखी जात सिंधूदूर्गातल्या आंबोली घाटात पहायला मिळते. झाडावर राहणारा ‘ग्लायडिंग फ्रॉग’ इथल्या वनसंपदेचा खास रहिवासी आहे.
झाडावर लोंबकळणारी हिरव्या रंगाची ग्लायडिंग फ्रॉग नावाची ही बेडकं आढळतात सिंधूदूर्गातल्या आंबोलीच्या जंगलात... समृद्ध निसर्गानं नटलेला हा आंबोली घाट विविध प्राणीसंपदेनं तितकाच समृद्ध आहे. त्यापैकीच एक म्हणजे ही झाडावर राहणारी बेडकं. हा बेडूक हिरव्या रंगाचा असतो त्यामुळे तो झाडाच्या पानांच्या आड, दिवसाही सहसा दिसून येत नाही. हा बेडूक झाडावरच घरटं बांधून राहतो. जुलै-ऑगस्ट हा काळ या बेडकांच्या प्रजननाचा काळ असतो.
पावसाळ्यात आंबोलीचा घाट हा पर्यटकांचं फेव्हरेट डेस्टिनेशन... त्यातच इथली प्राणीसंपदाही या पर्यटकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते. मग, काय कधी जाताय इथं भेट द्यायला... प्राणिजगतातलं मान्सून मॅजिक अनुभवायचं असेल तर याहून अधिक चांगला पर्याय नाही.