गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल्सवर धडक कारवाई

वसई-विरार भागात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक हॉस्पिटल्समध्ये सोनोग्राफी मशीन आणि प्रसुतीचा रेकॉर्डच नव्हता.

Updated: Jan 11, 2012, 12:36 PM IST

www.24taas.com, वसई-विरार

वसई-विरार भागात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक हॉस्पिटल्समध्ये सोनोग्राफी मशीन आणि प्रसुतीचा रेकॉर्डच नव्हता.

काही हॉस्पिटल्समध्ये प्रशिक्षित डॉक्टरांविनाच उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका क्लिनीकमध्ये शासनानं बंदी घातलेल्या गर्भपाताच्या गोळ्याही आढळून आल्या.

या सर्व हॉस्पिटल्सविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही कारवाई केली आहे. वसईतील साईनगर येथील ममता हॉस्पीटल, नालासोपाऱ्यातील तुळींज येथील राजसुख हॉस्पीटल, पूर्वेकडील साई हॉस्पीटल, वसईतल्या वालीव येथील शेहबाज आणि गायत्री हॉस्पीटलसह इतर ठिकाणी आरोग्य विभागानं कारवाई केली.