ओमी कलानीची 'गुडांगर्दी', आता पोलिसांकडे 'वर्दी'

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated: Nov 13, 2011, 07:08 AM IST

झी २४ तास वेब टीम, उल्हासनगर

 

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी या भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सीमा अर्पांटमेंटमध्ये साथिदारांसह दाखल होत ओमेशने लाठ्या काठ्या आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवत इमारतीच्या खाली आणुन प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. माझी आई इथुन निवडणूक लढवणार आहे तिच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्यास सर्वांचे हेच परिणाम होतील अशी धमकी ओमेशने दिल्याचा आरोप करण्यात आला.

 

पप्पू कलानीची उल्हासनगरमध्ये २५ वर्ष अबाधित सत्ता होती मात्र ५ वर्षापूर्वी या सत्तेला सुरूंग लागला पालिकेतली सत्ता गेली त्या पाठोपाठ पप्पू कलानी आमदारकीची निवडणूकही हरला सध्या आपली गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी कलानी गटाने आपली गुंडा इमेजचा फायदा घ्यायला सुरूवात केल्याने महापालिका निवडणूकीच्या तोंडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर भाजप आमदार कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी आणि त्याच्या मुलाला तडीपार करण्याची मागणी केली आहे.