विलासराव देशमुख सुप्रीम कोर्टात

मुंबईत गोरेगावमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Mar 3, 2012, 03:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

मुंबईत गोरेगावमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता  सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.

 

 

मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांनी सुभाष घईंना गोरेगामधील  जमीन दिली होती. त्यावरुन मुंबई हायकोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढत जमीन परत करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाने ओढलेले ताशेरे काढून टाकावेत यासाठी विलासरावांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.  राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.

 

 

दिग्दर्शक सुभाष घईं यांची मुक्ता आर्ट ही संस्था आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५  एकर जमीन दिली होती. मात्र हायकोर्टानं ही जमीन परत घेण्याचे आदेश दिल्यानं विलासराव देशमुखांना दणका बसलाय.  २००६ साली १९.५ एकर जमीन राज्य सरकारनं सुभाष घईंच्या मुक्ता आर्टला दिली होती. त्यापैकी १४.५ एकर जमीन सरकारनं परत घ्यावी आणि उरलेली ५ एकर जमीन २०१४पर्यंत सुभाष घई यांच्याकडेच ठेवण्याचं हायकोर्टानं आदेश दिले होते. यावेळी त्यांच्यावर कडक ताशेरे ओढले होते.

 

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="59345"]