ममता बॅनर्जींचा भाचा खाणार जेलची हवा

ममता बॅनर्जी यांचा भाचा आकाश बॅनर्जी याला आज पोलिसांनी अटक केली आहे, तसचं त्याला जामिन देखील मंजूर झालेला नाही. त्याला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Updated: Mar 1, 2012, 05:04 PM IST

www.24taas.com, कोलकाता

 

ममता बॅनर्जी यांचा भाचा आकाश बॅनर्जी याला आज पोलिसांनी अटक केली आहे, तसचं त्याला जामिन देखील मंजूर झालेला नाही. त्याला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

राजधानी कोलकता मध्ये ट्राफिक पोलीस आणि एका अधिकाऱ्याला मारहाण करणं तसचं ट्राफिकचे नियम मोडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आकाश बॅनर्जी याला आणि त्याच्या तीन साथीदारांना बुधवार अटक करण्यात आलं आहे.

 

सुरवातीला सामान्य गोष्ट आहे असं म्हणणारे शहर विकास मंत्री फिरहद हाकिम यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या घटने बाबत जेव्हा समजले तेव्हा त्यांनी आकाश अटक करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर ते दार्जिलिंगला रवाना झाले.

 

आपल्या भाचाच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझा स्वत:चा असा काही एक परिवार नाही, संपूर्ण जनतेला मी माझा परिवार मानते. जर कोणी गुन्हा करीत असल्यास त्याला त्याची शिक्षा भोगावी लागणारच. आकाश वर कलम ३५३, ३४१, ३२३ या अंतर्गत गुन्हा नोदंवण्यात आला आहे. तर वाहतूक अधिनियमच्या अंतर्गत  कलम ३५३ (सरकारी कर्माचाऱ्याला ऑन ड्युटी मारहाण करणं ) यामुळे जास्तीत जास्त दोन वर्ष शिक्षा होऊ शकते.