www.24taas.com, पणजी
भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील यशानंतर ‘लोककल्याण आणि स्वच्छ प्रशासन हीच आपल्या सरकारची प्रमुख कर्तव्य असतील.’ असा विश्वास व्यक्त केला आहे. गोव्यातील सरकारची सूत्र आपल्याच हाती येतील पण विधिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल असही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे पर्रीकर हेच भाजपचे मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे. गोव्यात सत्ताधारी काँग्रेसला धूळ चारत भाजपनं बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेता म्हणून पर्रीकरांनी चोख भूमिका बजावली. २००० ते २००५ या काळातील त्यांचं नेतृत्व आणि विकासकामांचा धडाका गोवेकरांनी अनुभवला.
आता पुन्हा त्यांच्या हाती सत्ता आल्यानं पर्रीकर आपली भूमिका चोख भूमिका बजावतील अशी आशा गोवेकर जनता करत आहे.