www.24taas.com, नवी दिल्ली
आजवर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दर डोई उत्पन्नाने पन्नास हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१०-११ या वर्षात दर डोई उत्पन्नात १५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ५३,३३१ रुपयांवर जाऊन पोहचलं. देशातील वाढत्या आर्थिक समृध्दीचं प्रतिबिंब यातून दिसून येतं. मागील वर्षी दर डोई उत्पन्न ४६,११७ रुपये होते त्यात १५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ५३,३३१ रुपयांवर पोहचलं.
भारतीय अर्थव्यवस्थेचा वृध्दीचा दर मागील आर्थिक वर्षात ८.४ टक्के इतका होता त्यामुळेच दर डोई उत्पन्नातही वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. दर डोई उत्पन्न हे देशाच्या एकूण समृध्दीचं महत्वाचं निर्देशांक मानण्यात येतो. राष्ट्रीय उत्पन्नाचे हे देशाच्या १२० कोटी लोकसंख्येच्या समप्रमाणात विभाजन केल्यानंतर दर डोई उत्पन्न निश्चित करण्यात येते. चलनवाढीचा दर लक्षात घेता दर डोई उत्पन्नातील वाढ २०१०-११ मध्ये ६.४ टक्के इतकी आहे.