'विवाहबाह्य संबंध : स्त्री घराबाहेर नाही'

विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.

Updated: Feb 1, 2012, 09:43 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार  आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.

एका खासगी विद्यापीठात काम करत असलेल्या महिलेशी संबंधित खटल्यात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे. विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला तिचा पती अथवा तिचे सासू-सासरे नाकारू शकत नाहीत, असे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नरींदर कुमार यांनी नमूद केले आहे.

आपल्या सहचारिणीकडून घटस्फोट मिळण्यासाठी याचिका दाखल केली असेल आणि तिचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा पतीचा आरोप असेल, तरी पत्नीला तिच्या सासरच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत हे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत संबंधित स्त्रीला तिच्या सासरी राहण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे आता संशयावरून अशा स्त्रीला घराबाहेर काढता येणार आहे.