बजेटविरोधात सराफांचा संप

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.

Updated: Mar 17, 2012, 10:12 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सराफा व्यवसायावर एक्साईज टॅक्स आकारला आहे. आयात कर २ टक्क्यांवरुन ४ टक्के करण्यात आला आहे. दोन लाखांवर सोने खरेदी केल्यास संबंधित ग्राहकांकडून सराफा व्यावसायिकांनी टीडीएस कपात करुन घ्यावा असं बंधन घालण्यात आलं आहे. या सर्व जाचक निर्णयाविरोधात सराफा व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय.

 

केंद्राच्या या धोरणामुळे सराफ व्यवसाय कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या जाचक निर्णयाला विरोध करण्यासाठी शनिवारपासून तीन दिवस सराफ बाजार बंद राहणार आहे.