दिल्लीतील स्फोटाचे धागेदोरे जम्मू-काश्मीरपर्यंत

दहशतवादी हे नेहमीच टेक्नलॉजीचा वापर करताना दिसून येतात, हेच काल झालेल्या दिल्लीतील स्फोटावरून समजते स्फोटामध्ये टाईमरचा, PETN या सारख्या गोष्टीचा वापर. म्हणजेच ह्या दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवाईचे तंत्रशुध्द शिक्षण घेतले असल्याचे निष्पन्न होते.

Updated: Oct 9, 2011, 12:46 PM IST

झी 24 तास वेब टीम, जम्मू 

 

दहशतवादी हे नेहमीच टेक्नलॉजीचा वापर करताना दिसून येतात, हेच काल झालेल्या दिल्लीतील स्फोटावरून समजते स्फोटामध्ये टाईमरचा, PETN  या सारख्या गोष्टीचा वापर. म्हणजेच ह्या  दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवाईचे तंत्रशुध्द शिक्षण घेतले असल्याचे निष्पन्न होते.  याचाच आणखी एक पुरावा म्हणजे या  स्फोटाची जबाबदारी स्विकारणारा मेल सुध्दा पाठवण्यात आलेला आहे.

 

[caption id="attachment_1999" align="alignleft" width="300" caption="दिल्ली स्फोटाचे धागेदोरे काश्मिर पर्यंत"][/caption]

दिल्ली बॉम्बस्फोटाचे धागेदोरे जम्मू-काश्मीरपर्यंत पोहचले आहेत.  दिल्ली  हायकोर्टाजवळ  बॉम्बस्फोट घडवण्याचा  'हुजीचा' इ-मेल हा  जम्मू-काश्मीरमधल्या  किश्तवाड जिल्ह्यातल्या सायबर कॅफेमधून पाठवल्याचं पोलीस  तपासात समोर आलंय त्यामुळे पोलिसांनी किश्तवाड जिल्ह्यातल्या सायबर कॅफेवर छापा घातलाय.  तसंच ज्या कॅफेमधून हा मेल पाठवण्यात आलाय,  त्या कॅफेच्या मालकाची चौकशी करण्यात येतेय. hajratuljehadi2011@gmail.com  या आयडीवरून हा मेल पाठवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतयं.

 

या मेलमध्ये हुजी अर्थात हरकत-उल-जिहादीनं  अफजल गुरूची फाशी रद्द करण्याची मागणी केलीय. तसंच फाशी रद्द न केल्यास अशाप्रकारचे बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकीही दिलीय.  त्याचप्रमाणे या सगळ्या स्फोटामागे लष्कराचा काही हात आहे का? याचासुध्दा पोलीस तपास करीत आहे.  एकूणच आतापर्यंतचा तपासावरून पोलिसांना असे आढळून आले आहे की, या स्फोटाचे  धागेदोरे जम्मू मध्ये असल्याची शक्यता  नाकारता येत नाही.  त्याचप्रमाणे काही प्रत्यक्षदर्शींचा वर्णंनावरून संशयितांची रेखाचित्र देखील प्रसिध्द करण्यात आली आहेत  या स्फोटाचे काही  पुरावे मिळविण्यासाठी दिल्ली पोलीस हायकोर्टचा परिसराची कसून तपासणी करत आहे,  दिल्ली बॉम्बस्फोटासाठी तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली  असल्याचे दिसून येते.

Tags: