दिल्ली हायकोर्टाबाहेर बॉम्बस्फोट, ११ ठार

आज सकाळी १०.१४ मिनिटांनी दिल्ली हाय कोर्टाच्या गेट नंबर ५ च्या समोर शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ११ जण ठार तर ७६ जण जखमी

Updated: Oct 9, 2011, 12:38 PM IST

झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली

 

आज सकाळी १०.१४ मिनिटांनी दिल्ली हाय कोर्टाच्या गेट नंबर ५ च्या समोर शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ११ जण ठार तर ७६ जण जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.  जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका सुटकेसमध्ये स्फोटकं ठेवून हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. स्फोटासाठी 'अमोनियम नायट्रेट'चा वापर करण्यात आल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्ली हायकोर्टात बुधवारी जनहित याचिकांवर सुनावणी होती. या याचिकांशी संबंधित लोक, वकील, अशिल इ. लोकांचे या स्फोटामध्ये बळी गेले.

[caption id="attachment_1995" align="alignleft" width="300" caption="दिल्ली बॉम्बस्फोट"][/caption]

चार महिन्यापुर्वी २५ मे रोजी दिल्ली हायकोर्टाच्या पार्किग परिसरात स्फोट झाला होता. पण, त्यात मनुष्यहानी झाली नव्हती. मात्र, आजच्या स्फोटाने दिल्लीसह सबंध देश हादरला आहे.  या स्फोटानंतर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags: