www.24taas.com, लखनौ
भ्रष्टाचार विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेबद्दल जनसामान्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी टीम अण्णांनी अखिल भारतीय एसएमएस कार्ड सुरू केलं आहे. टीमने या पहिल्या चरणात २५ रुपये किमतीची १ कोटी कार्ड्स उपलब्ध केली आहेत. टीम अण्णांच्या कोअर कमिटीतील सदस्याने असं सांगितलं आहे, की विशिष्ट संख्येच्या या स्क्रॅछ कार्ड्सना मीडियाच्या सकारात्मक, नकारात्मक तसंच उदासीन कव्हरेजला ध्यानात घेऊन उपलब्ध करण्यात आलं आहे.
'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या NGO च्या एका सदस्याने असं सांगितलं आहे की, मीडिया अण्णा समर्थकांपर्यंत खोटी किंवा चुकीची माहिती पोहोचवतं. हे 'द अण्णा एसएमएस कार्ड' एकदा विकत घेतल्यावर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वर्षभर होत असणाऱ्या कारभाराची माहिती लोकांना मिळत राहिल.
उत्तर प्रदेशमध्ये टीम अण्णाचे सदस्य वैभव माहेश्वरी यांनी सांगितलं, आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या समर्थकांकडून पैसे मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनने मुंबईतल्या एका सर्व्हरकडून बल्क एसएमएसची खरेदी केली आहे.