Shani Rahu Yuti 2025: 30 वर्षांनंतर शनि-राहूचा अतिशय विनाशकारी पिशाच योग! 2025 मध्ये 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

Shani Rahu Yuti 2025 : शनि आणि राहु या ग्रहांचं नाव घेतली की भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. अशात येत्या नवीन वर्षात 2025 मध्ये शनि आणि राहू यांच्या संयोगातून महाभयाकन असा पिशाच योग निर्माण होणार आहे. याचा विपरित परिणाम तीन राशींच्या लोकांवर अतिशय त्रायदायक होणार आहे.   

Updated: Nov 18, 2024, 09:10 PM IST
Shani Rahu Yuti 2025: 30 वर्षांनंतर शनि-राहूचा अतिशय विनाशकारी पिशाच योग! 2025 मध्ये 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर title=
Shani Rahu Yuti making Vampire Yog After 30 Years In 2025 these zodiac signs big crisis Loss of money

Shani Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा आपल्याला कर्माची शिक्षा देतो. तो एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो. सध्या तो स्वगृही कुंभ राशीत आहे. त्यामुळे त्याला एका राशीत पुन्हा जायला 30 वर्ष लागतात. कुंभ राशीतील शनिदेवाचा मुक्काम संपत आला असून नवीन वर्षात 2025 मध्ये तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत आधीपासून राहू ग्रह विराजमान आहे. अशात 30 वर्षांनंतर मीन राशीत राहू आणि शनिदेवाच्या मिलनातून अतिशय विनाशकारी पिशाच योग निर्माण होत आहे. हा योग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय घातक मानला जातो. त्यामुळे येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी दु:खत आणि संकटांचा असणार आहे. 

मीन रास 

या राशीच्या चढत्या घरात राहू आणि शनीचा संयोग होणार आहे. यामुळे या लोकांच्या आयुष्यात काही उलथापालथ होणार आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. यासोबतच काही मोठ्या आजाराचेही संकेत आहेत. शारीरिक सोबतच तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागणार आहे. नोकरी-व्यवसायातही थोडे सावध राहावे लागेल. तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनातही तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

मकर रास

या राशीमध्ये तिसऱ्या घरात पिशाच योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. भाऊ-बहिणीच्या आनंदात घट होऊ शकते. यासोबतच तुमच्या कामाचे, समर्पणाचे आणि मेहनतीचे फळ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. मित्र, कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे थोडे सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. दम्यासारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. प्रवासात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राहू तुमच्यात गोंधळ निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.

कन्या रास

राहू आणि शनीच्या संयोगामुळे निर्माण झालेला पिशाच योग या राशीच्या सातव्या घरात तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. संयमाने काम करा, तरच यश मिळेल. वैवाहिक जीवनातही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. यासोबतच कौटुंबिक जीवनात आनंदाची कमतरता भासू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)